सोलापुरात ऊस दरावरून प्रहार संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांसाठी सत्तेला लाढ मारू'
Solapur, Maharashtra 16 Nov 2026, 05:41 PM

सोलापुरात ऊस दरावरून प्रहार संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांसाठी सत्तेला लाढ मारू'

MH Times
@mhtimes
सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले होते. चार हुतात्मा चौकापासून सुरू झालेला शेतकरी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच गेट तोडून आत प्रवेश केला. ऊस दर साठी सुरू झालेल्या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेनं सहभागी होत, शेतकऱ्यांची बाजू मांडली. योग्य ऊस दर मिळत नाही तोपर्यंत सोलापुरातील शेतकरी आक्रमक होऊन साखर कारखाना मालकानं फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे.प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के पाटील यांनी संताप व्यक्त करताना सांगितलं, प्रहार शेतकरी संघटना सत्तेसाठी लाचार नाही तर आम्ही शेतकऱ्यांसाठी सत्तेला लाथ मारून सत्तेबाहेर पडू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation