Nagpur, Maharashtra
05 Nov 2026, 08:11 PM
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचा आवाज काढून चिडवलं, नागपुरात नितेश राणेंनी भाषण गाजवलं
MH Times
@mhtimes
भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी नागपुरात आयोजित ‘विशाल युवा संवाद’ कार्यक्रमात काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाचा समाचार घेतला, ‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात, मोदी का बाप भी जायेगा. मात्र, मी खरगेंना सांगतो, पाकिस्तान से तेरा अब्बा भी आयेगा ना, तो भी मोदी जायेगा नहीं,’ अशा शब्दांत भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधला. दुसरीकडे, ‘रिजिम चेंज’च्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मिमिक्री करत त्यांनी ठाकरे पिता-पुत्रांची खिल्ली उडवली. ‘रिजिम चेंज करणे एवढे सोपे आहे काय? तुझ्या बापाचे वडापावचे दुकान आहे काय?’ असा खोचक सवालही त्यांनी केला. नागपुरात आयोजित ‘विशाल युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)