Nagpur, Maharashtra
16 Nov 2026, 06:41 PM
नताशा आव्हाड यांना शिवानी वडेट्टीवार यांचा पाठिंबा, भाजपविरोधात जेन-झी रस्त्यावर उतरणार
MH Times
@mhtimes
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना, युवक काँग्रेसच्या पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांनी नताशा आव्हाड यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. डिलिमिटेशनच्या माध्यमातून संविधानविरोधी निर्णय घेतले जात असतील, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देता येणार नाही, अशी ठाम भूमिका शिवानी वडेट्टीवार यांनी मांडली. तसेच, जनतेच्या आणि तरुण पिढीच्या अधिकारांना धोका निर्माण करणाऱ्या निर्णयांविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
9
Comments (0)