बँक अन् सावकाराचा तगादा, शेतकरी रडला; दिवाळी सण विसरून रोहित पवार मदतीला सरसावले
Solapur, Maharashtra 08 Nov 2026, 05:26 PM

बँक अन् सावकाराचा तगादा, शेतकरी रडला; दिवाळी सण विसरून रोहित पवार मदतीला सरसावले

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार रविवारी सकाळपासून अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांना भेट देत, गोरगरीब शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरा केली.अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावातील सदाशिव कनोजे यांच्या शेतात रोहित पवार गेले. सदाशिव कनोजे यांची तीन एकर शेती आहे, जनावर विकून टँकर द्वारे मिर्चीच्या पिकांना पाणी दिलं. मात्र आता मिर्ची पिकांवर रोग पडल्याने सदाशिव कनोजे हे शेतकरी जबरदस्त अडचणीत सापडले आहेत. रोहित पवारांना पाहून शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलीला अश्रू अनावर झालेत.दुष्काळात पाणी नसल्याने टँकर द्वारे या शेतकऱ्याने मिर्ची बाग पिकवली मात्र मिर्चीवर रोग पडल्याने शेतकरी अडचणीत आहेत .त्यांचे अश्रू पुसण्याचे काम रोहित पवार करत आहेत .रोहित पवारांसमोर शेतकरी कुटुंब भावुक झाले होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation