Solapur, Maharashtra
19 Oct 2026, 05:41 PM
Rohit Pawar | जयकुमार गोरेंच्या गुन्ह्यांचा इतिहास काढला, रोहित पवारांची जहरी टीका
MH Times
@mhtimes
#solapur #rohitpawar #ncp #jaykuamrgore #devendrafadnavisराष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सोमवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर होते. पुणे पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणुकी निमित्त रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळावा झाल्या नंतर पत्रकार परिषद घेत पालकमंत्री जय कुमार गोरे यावर टीका केली. करामती पालकमंत्री अशी उपमा दिली आहे. पालकमंत्री म्हणून राजकारणात काम करत असताना, कालवा सल्लागार नियोजन बैठक घेणे गरजेचे होते, पाण्याचा योग्य नियोजन केले पाहिजे, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. जनावरांसाठी चाऱ्याच नियोजन योग्य पद्धतीने केले पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे, मात्र इथले पालकमंत्री जय कुमार गोरे, कुठल्या तरी नेत्याला फोडण, कुठल्याही विषयावर राजकारण करणं, सोलापूरच्या बाहेरून म्हणजेच सातारा जिल्ह्यातून काही ठेकेदार सोलापुरात आणण्यात आलं आहे. डीपीसी मधला फंड सातारा जिल्ह्यातील ठेकदराल देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जय कुमार गोरे यांचा पूर्वीचा इतिहास पाहिला असता, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्यांच्या करामती पाहून त्यांना करामती पालकमंत्री म्हणणे योग्य ठरेल अशी जहरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)