Solapur, Maharashtra
17 Nov 2026, 10:25 AM
CM फडणवीसांना मफलरमॅन ठरवलं, जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर घणाघात
MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मफलर मॅनबाबत खुलासा करताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नाव घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठे राजकीय वादळ उठले आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी नेते, आणि मंत्रिमंडळातील मंत्री रोहित पवार यांच्यावर तुटून पडले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांच्याबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. रोहित पवार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. सातत्याने अशा पद्धतीचे आरोप करायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची, आणि अजित दादांसाठी लढतोय हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहे. हेच प्रेम रोहित पवारांनी अजित दादा जिवंत असताना दाखवला असत तर त्यांना बरं वाटलं असतं, असे ते म्हणाले. तसेच लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेल्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे अशी प्रतिक्रिया जय कुमार गोरे यांनी दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
13
Comments (0)