Kolhapur, Maharashtra
12 Nov 2026, 08:30 PM
Satej Patil Kolhapur Speech | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सतेज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
MH Times
@mhtimes
गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चात आमदार सतेज पाटील सहभागी झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारला. पीकच आलं नसेल, तर शेतकऱ्यांनी कर्जफेड कशी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्जाचं पुनर्गठन हा उपाय नसून सरसकट पीककर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी सतेज पाटलांनी केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला शंभर टक्के पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)