Kolhapur, Maharashtra
09 Nov 2026, 05:40 PM
बंटी पाटील माझ्या तालुक्याचे जावई; धैर्यशील मोहिते यांचं एक नंबरी भाषण
MH Times
@mhtimes
'गोकुळ'च्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला.काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक बडे नेते मोर्चात उपस्थित राहिले. माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील मैदानात उतरले आहेत. सोलापूरसह अख्खा महाराष्ट्र बंटी पाटलांसोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यांना रस्त्यावरही फिरू द्यायचं नाही, असा इशारा मोहिते पाटलांनी विरोधकांना दिला. माझ्या अंगात थोडं रक्त कोल्हापूरचं सुद्धा आहे, असं विधान त्यांनी यावेळी केलं. बंटी पाटील माझ्या तालुक्याचे जावई असून मला यावंच लागणार, असंही ते म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)