Solapur, Maharashtra
09 Nov 2026, 04:51 PM
Solapur | शिवसेनेचे सिद्धीराम म्हेत्रेंनी मोदींचा बाप काढला, भाजप कार्यकर्ते तुटून पडले
MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते व आ रोहित पवार यांनी रविवारी 8 नोव्हेंबर रोजी अक्कलकोट तालुक्यात शेतकरी मेळावा घेतला होता, या मेळाव्यात शिवसेना शिंदे सेनेचे नेते व माजी गृहराज्य मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मोदींचा बाप काढला, तसेच रोहित पवार यांनी पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली , भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने ताबडतोब सोलापुरात पत्रकार परिषद घेत, शिंदे सेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांचा तीव्र शब्दात निषेध केला तर रोहित पवार यांच्यावर ही निशाणा साधला. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सिद्धराम म्हेत्रे यांना इशारा दिला असून, आम्ही तुमच बाहेर काढलं तर सोलापुरात तुम्हाला फिरता येणार नाही, साखर कारखाना असताना याच सिद्धराम म्हेत्रे यांनी अनेक शेतकऱ्याची ऊसाची बिले दिले नाहीत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)